Posts

Image
                   पर्यटनाची पंढरी...                                   माझी राधानगरी....                 परवाच माझ्या गावाचा  १११ वा वाढदिवस झाला. राजर्षी शाहूंनी वसवलेली राधानगरी. जिची स्थापना ९ फेब्रुवारी  १९०८  साली झाली. खरं तर "वळीवडे" या नावानं प्रसिद्ध असणारं आणि अगदी डोंगर कपारीत वसलेलं हे गाव. याला नवीन रूप,  नवीन नाव आणि नवी प्रसिध्दी दिली ती राजर्षी शाहूं महाराज यांनी... श्रीमंत राधाबाई म्हणजेच राजर्षी शाहू महाराज्यांच्या कन्या यांच्या विवाह प्रसंगी वळीवडे चे नामांतरन राधानगरी अस केले... आणि तेथून ही नगरी जग प्रसिद्ध झाली.          बलदंड सह्यादी च्या खांद्यावर रौध्र रूप धारण करून स्वतःचं अस्तित्व गाजवत वसलेली ही राधानगरी. पश्चिमेला असलेला फोंडा घाट गावाच्या संरक्षणासाठी सतर्क आहे.  भैरीबांभर येथील पाच बोटाच्या पिंपळाच्या झाडाखाली वसलेलं जागृत भैरी देवस्थान, हिच्यावर चौफेर नजर ठेऊन उभा आहे. गावाबाहेररून वाहणारी भोगावती नदी जी  संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करते आणि शाहूंच्या दूरदृष्टीतुन साकारलेला लक्ष्मी तलाव.            या काळजाच्या कप्